जिल्हा कृषि संशोधन व विस्तार नियोजन याचा आढावा घेणे व विविध सहभागी घटकांनी सादर केलेल्या वार्षिक कृती आराखड्यास मंजूरी देणे.
जिल्हयाअंतर्गत विविध सहभागी घटकांनी राबविलेल्या कृषि संशोधन व विस्तार कार्याचा अहवाल व आढावा घेणे व गरजेनुसार त्यांना मार्गदर्शन करणे..
जिल्हयाअंतर्गत कृषि संशोधन व विस्तार आणि इतर कार्यक्रमांतर्गत निधि स्विकारणे व प्रकल्पानुसार वाटप करणे.
शेतकरी समूह विकास व शेतकरी गट बांधणीसाठी देणे
शेतकर्यांना निविष्ठा, तांत्रिक सहाय्य, कृषि प्रक्रिया आणि पणन सेवा देण्यासाठी खाजगी क्षेत्रांना व इतर संघटनांचा जास्तीत जास्त सहभाग वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे
सिमांत शेतकरी, अनुसूचित जाती व जमाती शेतकरी, महिला शेतकरी यांना कृषि पत पुरवठा दार संस्थांनी जास्तीत जास्त मदत देणे संबंधी प्रोत्साहन देणे
कृषि सलग्न विभाग, कृषि विज्ञान केंद्र आणि प्रादेशिक संशोधन केंद्र यांनी शेतकरी सल्ला समिति स्थापन करून त्यांचे मूल्यमापन करणे संदर्भात मार्गदर्शन करणे व त्याबाबतचे नियोजन संबधित संशोधन विस्तार कार्यक्रमांतर्गत करणे.
जिल्हातील कृषि विकासास उत्तेजन देणे व सहाय्य करणे व आवश्यक तेथे योग्य करार करणे.
आत्मा आणि सहभागी घटकांच्या शाश्वत आर्थिक घडीसाठी उपलब्ध स्त्रोतरांची ओळख करून घेणे
उपलब्ध मनुष्यबळ व आर्थिक तरतुदीचा योग्य ताळमेळ घालून केंद्र शासनाच्या कृषि व सहकार विभागांतर्गत विविध कार्यक्रम व योजना उपयोगात आणणे.
आत्मा लेखासंबंधी लेखा परीक्षण करणे
आत्म्याचे नियम आणि उपनियम स्विकारणे व दुरुस्त करणे
प्रत्येक तीन महिण्यांनी आत्मा नियामक मंडळ बैठकीचे आयोजन करणे
जिल्हया मध्ये आत्मा प्रभावशाली अंमलबजावणीसाठी आवश्यक ती कार्यावाही करणे