जिल्हातील विविध सामाजिक आर्थिक समुह आणि शेतकरी यांना आसणार्या समस्या व अडचणी जाणून घेणे.
जिल्ह्याचे एकात्मिक संशोधन कृषि विस्तार नियोजन करणे ज्यामध्ये लघु आणि मध्यम स्वरूपाचे तंत्रज्ञान प्रथम प्राधान्याने घेता येईल.
जिल्हा शेतकरी सल्ला समितीच्या मदतीने वार्षिक कृती आराखडा तयार करणे जो आत्मा नियामक मंडळासमोर आढावा देणेसाठी व आवश्यक बदल करण्यासाठी तथा मंजुरीसाठी ठेवता येईल.
लेखा परीक्षणासाठी आवश्यक ते प्रकल्प लेखा जतन करणे.
सहभागी कृषि सलग्न विभाग, प्रादेशिक संशोधन केंद्र, कृषि विज्ञान केंद्र, बिगर सरकारी संघटना, खाजगी संस्था यांच्यात समन्वय ठेऊन वार्षिक कृती आराखडा राबविणे.
तालुका व गांव पातळीवर शेतकरी माहिती व सल्ला केंद्र स्थापन करणे व त्याद्वारे एकात्मिक कृषि विस्तार व तंत्र ज्ञान प्रसार कार्यक्रम राबविणे.
नियमित कार्यवाही अहवाल प्रत्यक्ष लक्ष साध्यासह आत्मा नियामक मंडळास पाठविणे जो नंतर कृषि व सहकार मंत्रालयास पाठविला जाईल.
आत्मा नियामक मंडळाने स्विकारलेली धोरण, गुंतवणुकी संबंधाचे निर्णय व केलेल्या मार्गदर्शनानुसार कार्यक्रम अंमलबजावणी करणे.
आत्मा व्यवस्थापन समितीची जिल्ह्यातील विविध तालुक्याचा आढावा घेण्यासाठी प्रत्येक महिन्यात एक आढावा बैठक होणे व सदरील बैठकीचा अहवाल राज्य मुख्यालय कक्षास पाठविणे.